जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील दापोरा येथे राहणाऱ्या तरुणाने आज गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपवून घेतले. घटनेची नोंद तालुका पोलीस स्टेशनला करायचे काम सुरु होते.
जळगाव तालुक्यातील दापोरा येथील रहिवासी सुनील रामकृष्ण महाडिक (मराठे, वय ३८) आज शनिवारी घटस्थापनेच्या दिवशी दुपारी घरात कोणी नसताना अति नैराश्यात असलेल्या सुनील महाडिक यांनी घराच्या छताला गळफास लावून घेत स्वतः:ची जीवनयात्रा संपविली.
शेजारच्या लोकांनी पोलिस पाटील यांना माहिती दिली. ग्रामस्थांनी सुनील महाडिक याला देवकर कॉलेजच्या प्रांगणात असलेल्या सामान्य रुग्णालयात आनले असता याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आईवडील असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.