जळगावातील मध्यवर्ती भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील दाणा बाजारात शटरचे कुलुप तोडून चोरट्यांनी दुकानातील रोकड घेत चोरी केल्याचे दिसून आले आहे. घटना गुरुवार दि. ११ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पियुष प्रकाश बियाणी (वय ३७,रा. नवीपेठ, जळगाव) यांच्या मालकीचे दाणा बाजारात दुकान आहे. बुधवारी दि. १० रोजी ते नेहमी प्रमाणे रात्री दुकानाच्या शटरला कुलूप लावून ते घरी गेले. त्यानंतर रात्री चोरट्यांनी या दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील ३ हजार ५०० रुपयांची रोकड चोरुन नेली. या प्रकरणी शुक्रवार दि. १२ रोजी तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल गजानन बडगुजर करीत आहेत.