पाचोरा ( प्रतिनिधी ) – दुचाकीस्वार व्यापारी तरूणाला कार मधून आलेल्या अनोळखी दोन जणांनी बेदम मारहाण करून दागिने व रोकड जबरी लांबविल्याची धक्कादायक घटना लोहारी बुद्रुक गावाजवळ घडली पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरमसिंग विजयसिंग राजपूत (वय-३८ ) हे पळासी ( ता. सोयगाव) येथे परिवारासह वास्तव्याला आहे. ते कटलरी दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. ४ फेब्रुवारी रोजी रात्री धरमसिंग राजपूत त्यांच्या मुलासह दुचाकीने पाचोरा येथून वरखेडीमार्गे सोयगाव येथे जात असतांना रस्त्यावरील लोहारी बु॥ जवळून जात असतांना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या कारने धरमसिंग राजपूत यांचा रस्ता आडविला. कारमधून दोघे खाली उतरवून त्यातील एक म्हणाली की, “तुला कधीचा शोधत होतो.” असे बोलून त्यांच्या दुचाकीला लाथ मारली आणि दुचाकीच्या हॅण्डलला लावलेली रोकड आणि दागिने ठेवलेली पिशवी जबरी हिसकावून लंपास केल्याची घटना घडली. धरमसिंग राजपूत यांनी पिंपळगाव हरेश्वर येथे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये करीत आहेत .