जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : पत्नीच्या गैरवर्तनाची गावात झालेली बदनामी आणि पत्नीसह तिच्या प्रियकराने केलेली मारहाण, शिवीगाळ याला कंटाळून अखेर आत्महत्या करणाऱ्या पतीला न्याय देण्यासाठी त्याच्या भावाने फिर्याद दिली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधाची गावात बदनामी झाल्याने जबर धक्का बसलेल्या पतीचा विष प्राशन केल्यामुळे गुरुवारी दि. ४ रोजी मृत्यू झाला. दरम्यान, पतीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेली पत्नी व तिचा प्रियकर दोघांविरुध्द जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पत्नीला अटक झालेली आहे. यासंदर्भात मृत तरुणाच्या भावाने तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. तालुक्यातील एका गावातील राहणारा संशयित आरोपी हा दि. १५ जून रोजी रात्री साडे नऊ वाजता हा दुसऱ्या गावात राहत असलेल्या विवाहित प्रेयसीच्या घरी गेला.(केसीएन) तेथे त्याने थेट प्रेयसीच्या पतीकडे शारिरीक संबंधाची मागणी केली. त्यास पतीने नकार दिला असता त्याचा राग आल्याने या तरुणासह मृताची पत्नी या दोघांनी पतीला लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकाराने मानसिक धक्का बसल्यामुळे व पत्नीच्या अनैतिक संबंधाची गावात चर्चा होऊन बदनामी झाली. या कारणाने कंटाळून पतीने दि. २ जुलै २०२४ रोजी विष प्राशन केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.(केसीएन)उपचार सुरु असताना दि. ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताच्या भावाने तक्रार दिली. त्यानुसार पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दि. ५ जुलै रोजी मयताची पत्नी व तिच्या प्रियकराविरुध्द गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे. संशयित आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.