चोपडा तालुक्यात अडावद पोलिसांची कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडगाव बु.येथील २४ वर्षीय तरुणास गावठी कट्टयासह अडावद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
विलास अत्तारसिंग बारेला (२४, पाटचारी परिसर, अडावद, ह. मु. वडगाव बु.ता. चोपडा) हा तरुण गावठी कट्टा बाळगत असल्याची गुप्त माहिती अडावद पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे सपोनि संतोष चव्हाण, पोउनि राजू थोरात, नासिर तडवी, अतुल पाटील, भूषण पाटील, जयदीप राजपूत यांनी वडगाव येथून विलास बारेला यास ताब्यात घेत त्याच्याकडून गावठी पिस्तूल जप्त केले.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. अधिक तपास सुरू आहे. दरम्यान चोपडा तालुक्यात यापूर्वी देखील गावठी कट्ट्यांची कारवाई करण्यात आलेली आहे.