अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) : महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमधील वर्कशॉपचा दरवाजा तोडून बाहेरपुरातील ७ जणांनी दुकानातील ३ लाख १५ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना १४ जुलै रोजी घडली. या प्रकरणी आता अमळनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
शेख बाबू शेख रमजान तेली (वय ६४, श्रद्धानगर, गलवाडे रोड) यांचे महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमध्ये जनरेटरचे वर्कशॉप आहे. दि. १४ जुलै रोजी ते
जळगावला गेले होते. हसन अब्दुल गनी तेली, बिलाल हसन तेली, करीम हसन तेली, फरीद हसन तेली, अब्दुल रज्जक अब्दुल गनी तेली, मकबूल अब्दुल रज्जाक तेली, कादीर अब्दुल रज्जाक तेली यांच्यासोबत इतर चार- पाच जणांनी १४ रोजी दुपारी ३ ते ४ दरम्यान दुकानाचा दरवाजा तोडला व ३ लाख १५ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. सर्व संशयित आरोपींविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.