जळगाव शहरातील नेहरू चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : गणपती पाहण्यासाठी आलेल्या तरुणीने वाहनाच्या डिक्कीत ठेवलेला ११ हजार रुपयांचा मोबाईल आणि पर्स चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ९ वाजेच्या सुमारास नेहरु चौकात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गंधर्व कॉलनीत सृष्टी अश्विन मोरे ही तरुणी वास्तव्यास असून तिच्याकडे (एमपी ६८, एमबी ६६३३) क्रमांकाची तिच्या नातेवाईकाच्या नावे असलेली दुचाकी आहे. दि. १२ सप्टेंबर रोजी शहरातील गणेश मंडळांमध्ये दर्शन धेण्यासाठी आईसोबत आली होती. तीने दुचाकी नेहरु चौकातील खान्देश मीलच्या रोडवर असलेल्या पार्कींगमध्ये लावलेली होती. सृष्टी मोरे हीने तिच्याजवळ असलेला मोबाईल पर्समध्ये ठेवून ती पर्स दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवली आणि ते दोघे गणेश मंडळांचे दर्शन घेण्यासाठी निघून गेले.
दर्शन घेवून दोघ मायलेकी ९ वाजेच्या सुमारास दुचाकी लावलेल्या ठिकाणी आल्या असता, त्यांना दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली पर्स मिळून आली नाही. तसेच चोरट्याने त्यांच्या डिक्कीचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेला ११ हजार रुपयांचा मोबाईल चोरुन नेला. तरुणीने लागलीच शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहे.