जळगाव तालुक्यातील धानवड तांडा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : फोनवर बोलणे करून न दिल्यामुळे एका व्यक्तीसह मुलगा व पुतण्याला नऊ जणांनी मारहाण करीत शस्त्राने वार केला. ही घटना दिनांक १० ऑक्टोबर रोजी धानवड तांडा येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोपट उखा राठोड (४०, रा. धानवड तांडा, ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. धानवड तांडा येथील त्यांचा मुलगा पवन पोपट राठोड याला गावाजवळील शिरसोली रस्त्यावर बोलवून एका महिलेने त्याला फोनवर बोलणे न करून दिल्याबद्दल जाब विचारला. त्यातून वाद होऊन नऊ जणांनी पोपट राठोड, त्यांचा मुलगा पवन आणि पुतण्या उमेश राठोड यांना मारहाण केली.
तसेच पोपट यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. यात ते जखमी झाले. या प्रकरणी पोपट राठोड यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.