अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
यावल (प्रतिनिधी) : फैजपूर येथील मिल्लत नगर येथून दि. २१ च्या मध्यरात्री ५ लाख रुपये किमतीचा ट्रक चोरीला केल्याची घटना घडली. या ट्रक चोरी प्रकरणी ट्रकचे मालक शेख जफर शेख अजगर यांनी तक्रार दिल्यावरून चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ट्रक चोरीची ही घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अज्ञात आरोपी हे ट्रक घेऊन जात असताना दिसत आहे. शेख जफर शेख अजगर यांनी आपली ट्रक (एम. एच.१९- झेड ५१८१) मिल्लत मधील हमजा लॉजजवळ लावलेली असताना दिनांक २१ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तो पळवला. परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अज्ञात आरोपी हे एका चारचाकी वाहनाने आलेले दिसत आहे व त्यांनीच हा ट्रक पळवला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तपास सपोनी नीलेश वाघ करीत आहे.









