जळगाव एमआयडीसी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : औद्योगिक वसाहतीमधील हाफकिन अजिंठा फार्मास्युटिकल्स कंपनीतून ६३ हजार रुपयांची १७ किलो तांब्याच्या धातूची पाइपलाइन चोरून नेल्याची घटना दिनांक १९ ते २१ जुलैदरम्यान झाली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी दि. २१ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका 25 वर्षे तरुणाला अटक करण्यात आली आहे.
सहायक व्यवस्थापक तुषार चौधरी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या हाफकिन अजिंठा फार्मास्युटिकल्स कंपनीतून ६३ हजार रुपयांची १७ किलो तांब्याच्या धातूची पाइपलाइन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला.bतपासातून ज्ञानेश्वर सोनार याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून ज्ञानेश्वर रतन सोनार (२५, रा. मेहरुण) याला अटक केली.









