जळगाव (प्रतिनिधी) – आपल्या साथीदारांसह जळगाव शहरातील विविध परिसरांमधून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून संशयितांकडून ५ दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहे. रूपेश संजय पाटील रा. साखरे ता. धरणगाव असे संशयिताचे नाव आहे. पोलीस त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि जळगाव शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असल्याने असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने रूपेश संजय पाटील हा त्याच्या साथीदारांसह दुचाकी चोरीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, युनुस शेख, रमेश जाधव, पोलीस हवलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, संदीप साबळे, पोना राहुल पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, ईश्वर पाटील, प्रविण मांडोळे, उमेश गोसावी, हेमंत पाटील, दिपक शिंदे, मुबारक देशमुख यांनी सापळा रचुन संशयित आरोपी रूपेश पाटील याला अटक केली. त्याच्या कडून चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.त्याला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.