नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- अंमली पदार्थावरील कारवाईत दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी 350 किलो हिरॉइन सुमारे 2500 कोटींच्या किंमतीचे जप्त केले असून चार जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे ड्रग्जच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी तीन जणांना हरियाणातून तर एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत जप्त केलेले हे मोठ्या प्रमाणातील अंमली पदार्थ आहे. बाजारात याची किंमत 2500 कोटी आहे. हे प्रकरण नार्को टेररिज्मचे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या रॅकेटचे संबंध पाकिस्तानशी असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मोहिमेचे काम सुरू होते, असे विशेष पथकाचे सीपी नीरज ठाकूर यांनी सांगितले.
या कारवाईत एकूण 354 किलो हिरॉइन जप्त करण्यात आले आहे. हे हिरॉइन कंटेनरमध्ये लपवून मुंबईहून दिल्लीत आणण्यात आले होते. मध्य प्रदेशातील शिवपुरीजवळील एका फॅक्टरीत या ड्रमग्जवर रासायिनिक प्रक्रिया करण्यात येणार होती. त्यानंतर हे ड्रग्ज पंजाबला पाठवण्यात येणार होते. त्यासाठी फरीदाबादमध्ये एक जागाही भाड्याने घेण्यात आली होती. अफगाणीस्तानातील माफिया या अंमली पदार्थांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवत होते.
या प्रकरणी फरदीबादमधील दोन आणि कश्मीरमधील एकाला अटक करण्यात आली आहे. कश्मीरमधील आरोपी केमिकल पुरवत होता. त्याद्वारे या पदार्थांवर रासायनिक प्रक्रिया करण्यात येत होती. त्यानंतप पंजाबमधील दोनजण हे ड्रग्जची विक्री करत होते. या रॅकेटचा पाकिस्तानशी संबंध असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.