जळगावातून २ महिला बेपत्ता
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात दोन महिला बेपत्ता झाल्याची नोंद २ पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. पोलीस पथक तपास करीत असून दोघेही महिलांचा शोध घेत आहे.
पहिली घटना गेंदालाल मिल परिसरात शनिवार दि. २४ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. पती पत्नीमध्ये वाद झाला. पतीने रागात चापट मारली. याचा राग आल्याने महिला घराबाहेर पडली. त्यानंतर बेपत्ता झाली. पतीने सर्वत्र शोध घेतला असता कुठेही तपास लागला नाही. अखेर ३६ वर्षीय विवाहिता बेपत्ता प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तपास पोहेकॉ रवींद्र सोनार हे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, कोणाला काही एक न सांगता घराबाहेर पडलेली ४८ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाली. शनिवार दि. २४ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना रुख्मिनीनगर परिसरात घडली. कुटुंबियांनी विवाहितेचे नातेवाईककडे शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली.तपास पोह प्रशांत पाटील हे करीत आहेत.