अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : हातगाडीवर कांदा लसूण विक्री करणाऱ्या वृद्ध महिलेच्या अंगावर लाल रंग टाकून तिच्याजवळील ७५ हजार रुपयांची पैशांची पिशवी लंपास केल्याची घटना शुक्रवारी दिनांक २६ रोजी दुपारी सव्वा १२ वाजेच्या सुमारास घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मायाबाई रामसिंग बहारे (वय ६५, रा. ताडेपुरा भीमनगर पैलाड) हिने कांदा लसूणची गाडी बाजारात लावून स्टेट बँकेतून ७५ हजार रुपये काढले. ते पैसे पिशवीत ठेवून बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरणा करण्यासाठी जात असताना विजय स्टील दुकानाजवळ एक जण मोटरसायकलवर आला आणि त्याने, मावशी तुमच्या साडीचा पदर लाल रंगाचा भरलेला आहे. असे सांगून सरळ निघून गेला. त्यांनतर वृद्धेने हातातील पिशवी बटाट्याची गाडीवर ठेवली. आणि साडीचा पदर धुवु लागली.
त्यावेळी त्यांच्या पाठीवर पण लाल रंग असल्याचे सांगितले. नन्तर महिलेची पैशांची पिशवी बटाट्याच्या गाडीवर दिसून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने पिशवी लांबवल्याची खात्री होताच महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.