अमळनेर तालुक्यातील कळमसरा येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : – तालुक्यातील कळमसरा येथील शेतकरी गोकुळसिंग गोरखसिंग जमादार (राजपूत, वय ७८) हे शुक्रवारी सकाळी त्यांच्या शेतात रब्बी पेरणीसाठी मशागत करीत असताना अचानक खाली कोसळले. रुग्णालय त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
शेतातील ट्रॅक्टरमालक जयदीपसिंग गिरासे यांनी त्यांना तातडीने अमळनेरला नेले. तेथे डॉ. बहुगुणे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, रवींद्र व राजेंद्र अशी दोन मुले, दोन मुली आहेत. या घटनेमुळे कळमसरा गावात शोककळा पसरली आहे.