जळगाव तालुक्यातील आव्हाणा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आव्हाणे येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांमध्ये मंगळवारी वाद झाला. या वादातून परस्पर विरोधी विनयभंगाच्या तक्रारी तालुका पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आल्या आहेत.
पहिल्या फिर्यादित ३९ वर्षीय महिलेने म्हटले आहे की, २३ मे रोजी सकाळी ११ वाजता फिर्यादीस व फिर्यादीचा पतीस यांना मस्जिदीत आमचे पसंतीचे मौलानाला नेमणुकीला कायम विरोध करत असतात. तुमची दोघांची इतकी हिम्मत असे बोलून फिर्यादीस मागुन व पुढ्न पकडुन विवस्त्र करण्याचा उद्देशाने फिर्यादीचे कपडे फाडुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन व आम्ही तुझ्या सोबत केलेले कृत्य जर गावात कोणाला सांगितले तर तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. यावरून उमर अली पिंजारी, इरफान युनुस पिंजारी, शेख कय्युम शेख रशीद, अरबाज अलाउद्दीन खाटीक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या फिर्यादीत २८ वर्षीय महिलेने म्हटले आहे की, २३ मे रोजी फिर्यादीचे पती व दिर असे मशिदीत त्याचे पंसतीचा मौलानाच्या नेमणुकीला कायम विरोध करत असतात या कारणावरुन व तुम्ही मुळ या गावाचे राहणारे नसुन दुस-या गावाहून आमच्या गावात राहण्यासाठी आले आहेत. तुम्हाला जास्त झाले आहे अशी धमकी देवून संशयित झाकीर सैय्यद रज्जाक याने फिर्यादीच्या कमरेला हात लावुन व डावा हात पकडुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
तसेच संशयित फरीद सैय्यद रज्जाक, मंजुर सैय्यद गफुर, इमरान खान अशानी फिर्यादीला शिवीगाळ करुन तुझ्या पतीला व दिराला समजावुन सांग नाहीतर त्यांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीची सासु सकीना हिला देखील शिवीगाळ करुन दमदाटी केली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही तपास पोहेकाँ लिलाधर महाजन करीत आहेत.