जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पकडून आणलेला ट्रक सुरक्षारक्षकांची नजर चुकवून मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात दोन इसमांनी पळवून नेला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक बाळू आधार पाटील (वय ५४) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अनेक ट्रक हे अवैधरित्या वाळू वाहतूक करताना मिळून आले, म्हणून जप्त करण्यात आलेले आहे. या ट्रकची रखवाली करण्याचे काम काही पोलिसांना देण्यात आले होते. मंगळवारी २३ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अनोळखी दोन व्यक्तींनी संगनमत करून दोन ब्रास वाळू भरलेला ट्रक क्र. एम एच १९ – ५८०८ 58 हा पळवून नेला आहे.
घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. दरम्यान पोलीस नाईक बाळू आधार पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.