पारोळा शहरात एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : पारोळा शहरातून एका गुन्हेगाराला एरंडोलच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हद्दपार केले होते. तरीदेखील तो पारोळा शहरात फिरत असल्याचे समजताच एलसीबीने त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्यावर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंश उर्फ गणेश काशिनाथ नरवाडे (वय २०, रा. रामदेव बाबा नगर, पारोळा) असे हद्दपार तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर एरंडोल येथील उपविभागीय दंडाधिकारी यांनी २८ नोव्हेंबर २०१३ रोजी हद्दपार केले होते. मात्र तरीदेखील तो पारोळा शहरात फिरताना दिसून आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन अटक करीत पारोळा पोलीस स्टेशन येथे एलसीबीने गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, हवालदार संदीप पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, विलास गायकवाड, राहुल बैसाणे यांनी केली आहे.