एलसीबी पथकाने केली अटक
जळगाव (प्रतिनिधी) : घराचा कडीकोंडा उघडून चोरी करणा-या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरातील राजकमल चौकात अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील एन सेक्टर मधील पद्मिनी एंटरप्रायजेस नजीक फौजी ढाब्यासमोर घरातून ९ जून रोजी २ मोबाईल आणि २९ हजार रुपये चोरी झाले होते. तपासादरम्यान हा गुन्हा एन सेक्टरमधे हमाली काम करणारा विनोद राठोड याने केल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून समजली होती. त्या माहितीच्या आधारे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदीप सावळे, विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, सचिन महाजन, इश्वर पाटील यांनी तपासकामी सहभाग घेतला.
त्यानुसार संशयित विनोद राठोड याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला अटक करून एमआयडीसी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असून त्याच्या अंग झडतीत दोन्ही मोबाईल आणि १५ हजार रुपये रोख रक्कम मिळून आले आहे.