अमळनेर ( प्रतिनिधी ) – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला धमकावणाऱ्या दोघा तरूणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवत तिच्यावर अत्याचार करून धमकी देणाऱ्या दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील एका साडेसतरा वर्षीय मुलीचा विवाह ठरला आहे. ती अठरा वर्षाची झाल्यावर तिचा विवाह करण्याचे नियोजन होते. दरम्यान, तरूणीला गांधीलपुरा भागातल्या मेहतर कॉलनीतील कुणाल उर्फ आण्णा देवा घोगले याने धमकी देवून अत्याचार केल्याची माहिती तिने कुटुंबाला दिली. त्याला रवी उर्फ रघूभाई घोगले मदत करायचा. नेहमी धमकी द्यायचा असेही तिने सांगितले. पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.