मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पिंप्री आकाराऊत येथील तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील पिंप्री आकाराऊत येथील मंगेश निवृत्ती माळी ( वय-२०) या तरूणाने घरी दुपारी छताच्या लोखंडी पाईपाला नायलॉनच्या दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्याला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.
आत्महत्येंचे नेमके कारण कळू शकते नाही. मुक्ताईनगर पोलीस स्थानकात त्याचे काका सुभाष महादू माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.