जळगाव (प्रतिनिधी) – रावेर येथील ब्राऊन शुगर गुन्ह्यातील आरोपी महिलेच्या साथीदाराला रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याला घेऊन पोलिसांचे पथक आज पहाटे रावेरात आले त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
काल रावेर येथे आरोपी महिलेस एक कोटी रूपयांच्या ब्राऊन शुगरसह ताब्यात घेतल्यानंतर तिच्या साथीदाराला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यामुळे अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने रावेर पोलीस आणि महसूल खात्याच्या मदतीने काल रावेर येथे कारवाई केली होती. रावेरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अख्तरी बानो पिता अब्दुल रऊफ (वय ४५ , रा.मोमीनपुरा बडा कमेलापास ता.जि. बर्हाणपुर) हिला अटक करण्यात आली. तिच्याकडून एक कोटी आठ हजार रूपये मूल्य असणारे ५००.४ ग्रॅम हेरॉईनचे दोन पाकीट जप्त करण्यात आले . या महिलेची चौकशी केली असता तिने हा माल मध्यप्रदेशातील मंदसौर येथील सलीम खान शेर बहादूर याचा असल्याचे सांगितले होते. या महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. एलसीबीचे पथक तातडीने मध्यप्रदेशात रवाना झाले. या पथकाने रात्री उशीरा सलीम खान शेर बहादूर याला अटक केली . ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या सहकार्यानी केली