जळगाव;– कापुस सोयाबीन व इतर तेलबिया आधारीत पीक पध्दतीस चालना देवून शेतक-यांच्या उत्पादनात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४- २५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.
जळगांव जिल्हयात राज्यपुरस्कृत कापुस उत्पादता वाढ अंतर्गत २७९३० हेक्टर व गळीत धान्य सोयाबीन उत्पादकता वाढ २२७० हेक्टर क्षेत्रावर सदरील कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सन २०२४-२५ अंतर्गत राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांच्या उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी विकास योजनेतर्गत खालील निविष्ठा पुरविण्यात येणार आहे.
१. मेटाल्डिहाईड किटकनाशक घटकाकरीता सोयाबीन लागवड करणा-या शेतक-यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावे
२ सदर योजने अंतर्गत खालील निविष्ठांचा लाभ खालीलप्रमाणे प्रति लाभाची १ हेक्टर च्या मर्यादत देणे प्रस्तावित आहे
* मेटलडीहाइड कोटकनाशक हेक्टरी ५ किलो/हे
* नॅनो यूरिया व नॅनो डिएपी:
अ) सोयाबीन पिकामध्ये हेक्टरी १.२५० लिटर प्रमाणकानुसार (५०० मिली बॉटल ०.४० हेक्टर साठी १ बॉटल, ०.८० हेक्टर साठी २ बॉटल) लाभ देय राहील.
ब) कापूस पिकामध्ये हेक्टरी २.५०० लिटर प्रमाणकानुसार (५०० मिली बॉटल) लाभ देय राहील.
* कापूस साठवणूक बैंग हेक्टरी ८ बैंग देय राहील
* बैटरी ऑपरेटेड फवारणी पंपः प्रति लाभाची ५ याप्रमाणे देय राहील.
या निविष्ठाचा पुरवठा करण्या करीता लाभाथीची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दिनांक ३० जून, २०२४ पर्यंत https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे. बियाणे, औषधे व खते या टायटल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील, तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी, जवळच्या तालुका कृषि कार्यालयास संपर्क साधावा असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.