१२९ जणांची कोरोनावर मात ; एकाचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यात प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे जिल्हा अनलॉक झाला असला तरी कोरोनाबाधितांच्या संख्येने जवळपास अर्धशतकी पल्ला गाठला असल्याचे दिलासादायक चित्र असून आज दिवसभरात केवळ ५३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून १२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जळगाव शहर-७ , जळगाव ग्रामीण-५ , भुसावळ-०, अमळनेर-२ , चोपडा-३ , पाचोरा-२ , भडगाव-1 , धरणगाव-६ , यावल-१, एरंडोल-२, जामनेर-३, रावेर-२, पारोळा-३, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-१, बोदवड-१ असे एकुण ५३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.







