जळगाव ( प्रतिनिधी ) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे २९३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत .
जळगाव शहर- ३, जळगाव ग्रामीण-३ , भुसावळ-२ , अमळनेर-१ , चोपडा-१ , पाचोरा- ८, भडगाव – १, धरणगाव -० , यावल -० , एरंडोल -० , जामनेर-० , रावेर -३ , पारोळा – ०, चाळीसगाव- २, मुक्ताईनगर -२ , बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील ० असे २८ कोरोना बाधित रूग्ण आज जिल्ह्यात आढळून आले आहेत .
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ४०८ कोरोना रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४८ हजार २३२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत . तर २ हजार ५९० कोरोना बाधितांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. तर सध्या जिल्ह्यात ५८६ बाधित रूग्ण उपचार घेत आहेत .