• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपड्यातील ऑनर किलिंग प्रकरणात पाच जणांना जन्मठेप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2024
in क्राईम, जळगाव
0
चोपड्यातील ऑनर किलिंग प्रकरणात पाच जणांना जन्मठेप

बहिणीसह तिच्या प्रियकराला संपवणाऱ्या भावांना शिक्षा

पुरावे नष्ट करण्याचा सल्ला देणारा वकीलासही पाच वर्षांचा कारावास

जळगाव (प्रतिनिधि) : चोपडा शहरातील प्रेमी युगुलाच्या खून प्रकरणी मुलीच्या भावांसह पाच जणांना अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सोमवार दि. १ एप्रिल रोजी सुनावली आहे. तर वकिलासह एकाला पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या खटल्यात एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले.

चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत वर्षा समाधान कोळी आणि राकेश संजय राजपूत यांच्यात दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधाच्या माहिती मिळाल्यावरून संशयित आरोपी हे मुलीला वारंवार सांगायचे की, सदर मुलगा राकेश हा दुसऱ्या समाजाचा असल्यामुळे त्याच्याशी प्रेम संबंध तोडून टाकावे. मात्र त्यावरून त्यांच्या घरात नेहमी वाद होत होते. दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी मयत राकेश राजपूत हा संशयित आरोपीच्या घरी रात्री आठ वाजता आल्याने व तो वर्षा कोळी हिच्याशी प्रेमसंबंध बाबत बोलू लागल्याने त्याचा संशयित आरोपींना राग आला.

त्यांनी त्याला जाब विचारला. त्यावरून वाद झाला. यावेळी संशयीतांनी वर्षा कोळी व राकेश राजपूत दोघांनाही दुचाकीवर बसवून चोपडा शहराजवळील नाल्याजवळ नेले. तेथे राकेश राजपूत याला बंदुकीने गोळी झाडून त्याचा खून करण्यात आला तर वर्षा कोळी ही प्रतिकार करीत असताना तिला देखील जागीच पकडून गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर चोपडा शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात पोलिसांचा तपास सुरू होता संशयित आरोपींनी पुरावा देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अमळनेर न्यायालयात दाखल खटल्यात २१ साक्षीदार तपासण्यात आले.

विशेष म्हणजे संशयित आरोपींनी गुन्हा केल्यानंतर वकील नितीन मंगल पाटील यांच्याकडे जाऊन खुणाबाबत सल्ला घेतला. खून करणे, खुनाची तयारी करणे तसेच पुरावा नष्ट करणे असे विविध प्रकारचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते. तसेच एकमेकांसोबत झालेल्या संभाषणाच्या सीडीआर रिपोर्ट व एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तसेच पिस्टल मधील गोळी या सर्व पुराव्यानुसार न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला. तपासाअधिकारी डीवायएसपी ऋषिकेश रावले, नाशिकचे वैद्यकीय अधिकारी आर. के. गढरी, मयत राकेश राजपूत याची आई मिनाबाई संजय राजपूत तसेच इतर पुराव्यानुसार अमळनेर न्यायालयाने संशयित आरोपींना शिक्षा ठोठावली आहे.

जिल्हा न्यायाधीश २ पी. आर. चौधरी यांच्यासमोर खटल्याचे कामकाज चालले. सरकारी वकील एड. किशोर बागुल यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात तुषार आनंदा कोळी (वय वर्ष २३), भरत संजय रायसिंग (वय वर्ष २२), बंटी उर्फ जय शांताराम कोळी (वय १९), आनंदा आत्माराम कोळी  (वय ५६) रवींद्र आनंदा कोळी (वय वर्ष २०) यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच संशयित आरोपी पवन नवल माळी आणि वकील नितीन मंगल पाटील यांना पाच वर्षे शिक्षा आणि एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा अशी शिक्षा ठेवण्यात आली आहे.

खटल्या कामी पैरवी अधिकारी ए. एस. आय. उदयसिंग साळुंखे ,पोहेको हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर, विशाल तायडे आदींनी सहकार्य केले.

सल्लागार अन् गुन्हेगार, सिसिटीव्हीमुळे वकीलच फसला

आरोपी एक ते पाच यांनी बहिणी व तिच्या प्रियकराला संपविल्यानंतर सल्ला घेण्यासाठी नितीन मंगल पाटील यांची भेट घेतली. यात नितीन पाटील याने कुटुंबातील विधी संघर्ष बालकाच्या हातात पिस्टल देऊन त्याला आरोपीचा पिंजऱ्यात उभं करा, अल्पवयीन असल्याने लगेच सुटेल असा सल्ला आरोपींना दिला होता. यासह गुन्ह्यात वापरलेले कपडे जाळून टाकने, पुरावा नष्ट करण्यात मदत करणे, या आरोपांखाली नितीन पाटील यासह त्याला मदत करणाऱ्या पवन माळी या दोघांना पाच वर्षे करावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तसेच राहिल्याने विधी संघर्ष बालक हा त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाल्याने नितीन पाटील हा सल्ला देणारा वकीलच पुरावा नष्ट करण्यामागे असल्याचे निष्पन्न झाले. यासह आरोपी व नितीन पाटील यांच्यातील संभाषण सी डी आर रिपोर्ट मुळे समोर आल्याने नितीन पाटील यास या प्रकरणात पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

 


 

 

Previous Post

एमआयडीसीत लागलेल्या आगीत खाद्यपदार्थांचा मुद्देमाल जळून खाक

Next Post

शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी भाजपाच्या करण पवार यांना संधी? उद्या होणार घोषणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी भाजपाच्या करण पवार यांना संधी? उद्या होणार घोषणा

शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी भाजपाच्या करण पवार यांना संधी? उद्या होणार घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon