जळगाव ;- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहरात कॉंग्रेस भवन पासुन सायकल यात्रा काढली.
उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील गरिब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता ८५० रुपयांचे गॅस सिलिंडर घेणे या गरिब कुटुंबांना परवडत नाही. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भुतान, बांग्लादेशाला पेट्रोल ३० रुपये लिटर व डिझेल २२ रुपये लिटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र त्याच पेट्रोल डिझेलसाठी १०० रुपये मोजावे लागतात. मोदी सरकारने केलेल्या या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह इतर वस्तुंचीही महागाई झाली आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण करुन ठेवले असून त्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून या सरकारचा निषेध व्यक्त केला .
महागाई विरोधातील या आंदोलनात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील,एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, राजीव पाटील योगेंद्रसिंग पाटील, डी जी पाटील, प्रदीप पवार, श्याम तायडे, दिपक सोनवणे,प्रदीप सोनवणे,ज्ञानेश्वर कोळी, जगदीश गाडे, योगेश देशमुख, अमजद पठाण, बाबा देशमुख,मुजिब पटेल, डॉक्टर जगदीश पाटील, नीरज बोरखेडे, राजू जाधव, संजीव पाटील अनिल निकम, आदी पदाधिकारी उपस्थित होते