जळगावात आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा सहभाग
जळगाव (प्रतिनिधी) : देश व राज्यात पेपर फुटीचे वाढते प्रमाण, नोकर भरतीला ब्रेक, शेतमालाला भाव न मिळणे, खते व बियाण्यांचा काळाबाजार, शेतकऱ्यांची कर्जासाठी होणारी अडवणूक आदी मुद्दे घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शुक्रवारी दि. २१ जून रोजी दुपारी काँग्रेस भावनाबाहेर महायुती सरकारचा फलक बनवून त्यावर चिखलफेक करून आंदोलन केले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन निषेध नोंदविण्यात आला.
आ. शिरीष चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी जि. प सदस्य प्रभाकर सोनवणे, माजी नगराध्यक्ष दारा मोहमद, हरीश गणवाणी, शहराध्यक्ष श्याम तायडे, डॉ ए.जी भंगाळे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी पेपरफुटीप्रकरणी दोषी सरकारवर पदाधिकाऱ्यांनी टीका केली.
यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी. डी. पाटील,जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, आत्माराम जाधव, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, धनंजय चौधरी, आशुतोष पवार, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष, दिनेश पाटील, सुभाष जाधव, जामनेर तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, एस. टी.पाटील, सचिन सोमवंशी, भडगांव तालुकाध्यक्ष रतीलाल महाजन, सेवादल अध्यक्ष संजय पाटील, बोडवड दिलीप पाटील, पिंटू पाटील, चोपडा अध्यक्ष नंदकिशोर संगोरे, जळगाव तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, धरणगाव तालुकाध्यक्ष व्ही. डी. पाटील, शहराध्यक्ष अनंत परीहार, रावेर तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, अमळनेरचे गोकुळ बोरसे, वाशिम काझी, देवीदास ठाकरे, मीरा सोनवणे, युवराज खडके, दीपक सोनवणे,जलील पटेल, डॉ.ऐश्वर्या राठोड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.