जळगाव ( प्रतिनिधी ) ;-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस ‘संकल्प दिवस साजरा करण्यात येत आहे. आज जळगावातील काँग्रेस भवन येथे नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरी काळ्या कायद्यांविरुद्ध आंदोलन करण्यात येऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कायद्यांच्या कागदांची होळी करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. संदीप पाटील , उदय पाटील, यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील,इंटक जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील ,अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष मुन्नावर खान,जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील,जिल्हा उपाध्यक्ष शाम तायडे ,राजस कोतवाल,जमील शेख,मनोज सोनवणे,देवेंद्र मराठे,मुजीब पटेल,अमजद पठाण,मनोज चौधरी,प्रदीप सोनवणे,जगदीश गाढे, जगपालसिंग गिर,ज्ञानेश्वर कोळी,दिपक सोनवणे, योगिता शुक्ला,अमीना तडवी,विष्णू घोडेस्वार,मालोजीराव पाटील विजय वाणी, जाकीर बागवान,परवेज पठाण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.