जळगाव ( प्रतिनिधी ) ;- राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज ५ रोजी सकाळी काँग्रेसतर्फे जळगाव शहरात गरजुंना किराणा साहित्याचे वाटप माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अ.जा. विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप सोनावणे, अल्पसंख्यांक आघाडीचे पदाधिकारी जाकीर बागवान, शहराध्यक्ष अमजद पठाण, योगेश देशमुख, दीपाक सोनवणे,आदी उपस्थित होते. या किराणा साहित्यामध्ये गहू,तांदूळ,तेल,डाळ आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.