जळगाव (प्रतिनिधी) – युवक काँग्रेस मध्ये काम करायचे असेल तरच पद घ्या, अन्यथा पदे सोडावी. तसेच पद शोभेसाठी मिरवू नका. पक्षनेते राहुल गांधींचा संदेश आहे, अधिकाधिक युवकांना काम करण्यासाठी सहभागी करा, असे प्रतिपादन काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्रियांका सानप यांनी केले.
यावेळी मंचावर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हितेश पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे मुक्तदिर देशमुख यांच्यासह विधानसभा क्षेत्र प्रमुख उपस्थित होते.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील म्हणाले की, चोऱ्या कशा करायच्या हे भाजपकडून शिकावे. काळे धन तर भारतात आणले नाही पण इथलेच धन घेऊन निरव मोदी, मल्ल्या, चोक्सीला नेऊ दिले. मोदी हे व्यापारी आहे, ते देशात व्यापार करीत आहे. सरकारी संस्था विकत असून मोदी अदानी, अंबानी ला विकत आहेत. तरुणांना रोजगार कसा देणार ? काहीतरी निरर्थक विषय काढून लोकांना भरकवटत आहेत. युवा लोकांनी आता भाजप प्रशासनाचा कावा ओळखावा आणि रोजगार दो म्हणून मागणी करावी, असेही ते म्हणाले.
यानंतर प्रियंका सानप म्हणाल्या की, आज 40 करोड युवा बेरोजगार आहेत. याना रोजगार देणार कोण ? सरकारी कंपन्या विकल्यामुळे तरुण बेरोजगार झाले आहेत. यापेक्षाही बिकट परिस्थिती होणार आहे. युवकांना रोजगार द्या, अन्यथा राजीनामा द्या, जनहिताचचे निर्णय घेतले नाही. असे म्हणत त्यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी इम्रान खान, मुजीब पटेल, दीपक राजपूत, नीरज बोराखेडे, वसीम जनाब, किरण पाटील, अमोल राऊळ, संदीप पाटील, आंबादास गोसावी, प्रवीण पाटील, मधू गवळे, प्राग घोरपडे आदी उपस्थित होते.
या मेळाव्यानंतर युवक काँग्रेसने दुचाकी रॅली काढत शहरवासीयांचे लक्ष वेधले. या रॅलीत टॉवर चौक, नेहरू चौक, कोर्ट चौक, नवीन बसस्थानक मार्गे, जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात आली.