• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काँग्रेस पक्षाच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रदीप पवार यांची नियुक्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 7, 2021
in जळगाव
0

राष्ट्रीय जनरल सचिव के.सी. वेणुगोपाल यांची घोषणा

जळगाव (प्रतिनिधी) – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रदीप गुलाबराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रीय जनरल सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी ७ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी केली आहे.

जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून प्रदीप गुलाबराव पवार यांची नियुक्ती केली आहे. प्रदीप पवार हे भडगाव येथील देशमुखवाडीचे रहिवासी असून त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस कमिटी मध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष शिरीष दादा चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, राज्य पदाधिकारी डी.जी. पाटील, मावळते जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप भैय्या पाटील, जिल्हा सरचिटणीस जमील शेख ,अविनाश भालेराव,सचिन सोमवंशी यांच्यासह मनोज सोनवणे , ज्ञानेश्वर कोळी उद्धव वाणी ,प्रमोद घुगे ,भाऊसाहेब सोनवणे  समाधान पाटील,जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, यांनी अभिनंदन केले आहे.

“पुढील काळात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला सुवर्ण दिवस आणण्यासाठी मी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रयत्न करेन. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी पाठपुरावा करेल. देशभरात भाजप सरकारमुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले असून त्याविरोधात आवाज वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. काँग्रेस पक्षाची वाढ करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन तरुणांचा भरणा काँग्रेसमध्ये करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील” अशी प्रतिक्रिया निवडीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी माध्यमांना दिली आहे.

नूतन जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचा परिचय ; राजकीय कारकीर्द

बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या राजकीय जीवनाची सुरवात विद्यार्थी दशेपासून झाली. जळगाव येथील एम. जे. कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना विद्यापीठ प्रतिनिधीही म्हणून निवडून आले होते. त्याच वर्षी पुणे विद्यापीठातील स्टुडन्ट कॉन्सिल मध्ये निवडून आले. प्रदीप पवार हे इंदिरा कॉंग्रेसची विद्यार्थी संघटना एन.एस.यु.आय. चे महाराष्ट्र सरचिटणीस झाले. नागपूरचे डॉ. श्रीकांत जिचकार हे त्या वेळेस चे एन. एस. यु. आय. महाराष्ट्र इंदिरा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेस पक्षाने पुणे विद्यापीठातील स्टुडन्ट कौन्सिलच्या निवडणुकाची संपूर्ण जबाबदारी प्रदीप पवार यांच्यावर सोपवली होती. १९७८ ते १९८६ पर्यत निवडणूक प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली झाल्या. जळगाव जिल्ह्यातून पुणे विद्यापीठाचे चेअरमन होण्याचा मान फक्त पवारांना मिळाला आहे. त्यानंतर खा. विलास मुत्तेमवार, खा. गुरुदास कामत, माजी मंत्री दिग्विजय खानविलकर या प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष्यांसोबत पवारांनी प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस अशी अनेक पदे भूषवली आहेत. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेस सेवादल ही संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेस मधील प्रभावी युवक नेत्यांना सेवादल संघटनेत सामील करून घेतले. खा. तारीक अन्वर यांच्यावर ऑल इंडिया सेवादल अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. खा. तारीक अन्वर यांनी महाराष्ट्र सेवादलाचे जबाबदारी राज्यातील सहा प्रमुख युवक नेत्यांवर सोपवली होती. त्यात पवारांवर प्रदेश सेवादल उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. त्यासाठी कर्नाटक प्रांतातील घटप्रभा येथे सेवादल नॅशनल ट्रेनिंग (एन.ती.सी) ची जबाबदारी पदीप पवार यांना देण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विधानसभेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पवारांना पदोन्नती देऊन प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली.

१९९२ साली भडगाव येथून जिल्हा परिषदेची निवडणूक निवडून भडगाव पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात भडगाव पंचायत समितीचे ग्राम अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यामुळे २ ऑक्टोबर १९९४ रोजी वर्धा येथे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांचे हस्ते सुवर्ण पदक व दोन लक्ष रुपये देण्यात आले होते. १९९५ साली त्यांनी विधानसभेचे भडगाव-पारोळा येथून काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात आली होती. १९९७ साली पुन्हा जिल्हा परिषदेत विजयी होऊन त्यांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती म्हणून काम पाहिले. याच दरम्यान पक्ष श्रेष्ठींनी महाराष्ट्र राज्यातील लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रदेश काँग्रेसचे निरिक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. लोकसभा ( अहमदनगर, कराड) झिलापरिषद (धुळे, लातूर, गोंदिया, नासिक) नगरपरिषद (मनमाड, नांदगाव, कालवण, सुरगाणा, डहाणू, बुलढाणा) तसेच मध्य प्रदेशातील धर्मपुरी व झाबुवा विधानसभा आणि उत्तरप्रदेशातील पिलिभीत असे अनेक ठिकाणी परराज्यात देखील पक्षाने महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.


 

 

Previous Post

दुचाकी चोरट्यास २ वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा

Next Post

ट्रकच्या टाकीचे कुलूप तोडून १७ हजारांच्या डिझेलची चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ट्रकच्या टाकीचे कुलूप तोडून १७ हजारांच्या डिझेलची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon