नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ;- देशात ४ लाखांवर गेलेली कोरोना रुग्णांची संख्या आता १० हजारांहून कमी झाली आहे. त्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात देशाच्या रुग्णासंख्येत कमालीची घट झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात ८० हजार ८३४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या ८४ हजार ३३२ इतकी नोंदवण्यात आली होती. कालच्या तुलनेत आज देशात बाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे पहायला मिळत आहे. देशात आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही २ कोटी ९४ लाख ३९ हजार ९८९ इतकी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताला मोठा धक्का बसला होता. आजही देशात कोरोनाची दहशत कायम आहे. मात्र रुग्णसंख्या आलेख कमी होत असल्याने नागरिकांना मोठा दिसाला मिळाला आहे.