वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा येथे नुकताच आज रोजी शासकीय विश्राम गृह चोपडा येथे झालेल्या पक्ष श्रेष्ठींच्या बैठकीत असंख्य तरूणांनी, मनसेत, प्रवेश केला आहे.
राजसाहेबांच्या विचारातून असंख्य तरूणांनी ” महाराष्ट्र नवनिर्माण सेना” या पक्षात मनसेचे पदधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करून राजकीय वर्तूळात दे धक्का! दिला आहे. यामुळे पक्षात आनंदाचे जोशपूर्ण वातावरण आहे.
राज साहेब ठाकरे यांच्या हिंदू विचारांनी प्रेरित होऊन व नेतृत्वावर विश्वास ठेवून ,जळगाव मनसेचे जेष्ठ नेते अनिलभाऊ वानखेडे व रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम व रस्ते आस्थापना तालुकाध्यक्ष अजय परदेशी यांच्या नेतृत्वाखाली व मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष निलेश बारी, कल्पेश पवार ,निखिल पाटील ,अक्षयभाऊ पाटील , दीपकभाऊ विसावे , बळीराम पाटील ,निलेश खैरनार, सनी पाटील, विवेक मराठे, व्यंकटेश पवार, भैया मराठे यांच्या उपस्थितीत , वेळोदे , खाचने, गलंगी , घोडगाव , बुधगाव, कठोरा ,चोपडा, येथील असंख्य विद्यार्थी व युवकांनी मनसेत प्रवेश केला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते व साधन सुविधा चोपडा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना , पदधिकारी चोपडा, यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.