चाळीसगाव ;- कोरोना आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील मुस्लिम समाजाच्या निवडक पदाधिकारी यांची बैठक आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात घेण्यात आली.
मालेगाव, धुळे व औरंगाबाद येथे कोरोना विषाणूचा वाढत जाणारा प्रादुर्भाव पाहता खबरदारीच्या उपाययोजना म्हणून चाळीसगाव तालुका व शहर सलग ३ दिवस बंद ठेवत जनता कर्फ्यु पाळला जाणार आहे यात चाळीसगाव तालुक्यातील मुस्लिम समाज पूर्णपणे सहकार्य करणार असून रमझान चा महिना असल्याने सोशल डिस्टन्स चे पालन करत रमझान साजरा करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांवर निर्बंध लावत आम्ही स्वतः बारीक लक्ष ठेवणार असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने सांगितले.
चाळीसगाव तालुक्याला हिंदू मुस्लिम एकतेची मोठी परंपरा असून या कोरोनाच्या संकटकाळात एकमेकांना सांभाळून घेत ही परंपरा पुढे नेण्याचे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
रमजान सुरू असल्याने रोजा सोडण्या साठी नगरपालिका मंगल कार्यालय हुडको येथे सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान मुस्लिम बांधव खरेदी साठी असतात तेथे सोशल डिस्टन्सनिग चे कसोशीने पालन करण्याचे समाजातील उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे २ हजार मास्क वाटपासाठी सुपूर्द करण्यात आले.