चाळीसगाव तालुक्यात वाघळी शिवारात घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाघळी शिवारात शेतकऱ्याने नुकताच गहू काढून तो शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला होता. त्यातील १९ गोणी गहू चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
चोरट्यांनी वाघळी येथील रहिवासी डॉ. भास्कर भोळे यांनी नुकताच काढलेला गव्हाच्या १९ गोण्या त्यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमधून लांबवलेल्या आहेत. चोरट्यांनी पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून १९ गव्हाच्या गोण्या चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. चांभार्डी शिवारात असलेल्या डिगंबर भास्कर भोळे यांच्या शेतातील गहूदेखील चोरट्यांनी लंपास केला आहे. या चोरीची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. चोरट्यांनी धान्यही चोरून नेल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.