जळगावात एलसीबीची सावखेडा गावात कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग कामगिरी करीत सावखेडा बुद्रुक येथील पाण्याच्या मोटार चोरणाऱ्या दोघा संशयित आरोपीना अटक केली आहे. दोघांना पुढील कारवाईकामी जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शिवाजी श्रावण सोनवणे (वय ३३) व राजेंद्र सुनिल पाटील (वय २३, दोन्ही रा. सावखेडा बु।। ता. जि. जळगाव) अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. दि. १८ जूनच्या रात्री सावखेडा बुद्रुक येथील रहिवासी समाधान विश्राम सोनवणे यांची पाण्याची मोटार कुणीतरी चोरट्यांनी चोरुन नेली होती. दुस-या दिवशी चोरीचा प्रकार उघडकीस आला. मोटारीला लागलेले पिव्हीसी पाईप कापून मोटारीची चोरी करण्यात आली होती.(केसीएन)अवघ्या एक महिन्याच्या आत या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील पोहेकॉ. जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर व पोकॉ बबन पाटील या तिघांनी लावला आहे.
पाण्याच्या मोटार चोरीचा गुन्हा त्याच गावातील शिवाजी सोनवणे आणि राजेंद्र पाटील या दोघांनी केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. तिघांच्या पथकाने दोघांना शिताफीने ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला. अटकेतील दोघांना पुढील कारवाईकामी जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.