भुसावळ येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील आठवडे बाजारातील एका डॉक्टरच्या दवाखान्याला लावलेला ३५ हजार रुपये किमतीचा ए.सी. अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. सुनील प्रकाश रत्नानी (वय-४८, रा. रत्नानी हॉस्पिटल, बद्री प्लॉट, भुसावळ) हे वैद्यकीय व्यवसाय करून ते उदरनिर्वाह करत आहेत. त्यांचे भुसावळ शहरातील आठवडे बाजारात ओम कृष्णा डेंटल क्लिनिक नावाचा दवाखाना आहे. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दवाखान्यासाठी लावलेला ए.सी हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली. या संदर्भात डॉक्टर सुनील रत्नांनी यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर हे करीत आहे.