जळगाव तालुका पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील विविध भागातून चोरीस गेलेल्या दुचाकी पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केल्या आहे. सुनील जाधव यांची दुचाकी एक वर्षापासून सागर पार्क येथुन चोरी झाली होती. तालुका पोलिसांकडून मालकांना परत करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात राहणाऱ्या सुनील जाधव यांची दुचाकी (एमएच क्र. १९ इ.इ ७२१३) ही सागर पार्क येथून चोरी झाली होती. त्यांनी दुचाकीचा शोध घेऊनही ते कुठे सापडली नाही. मात्र ही दुचाकी १ वर्षापासून बेवारस स्थितीत तालुका पोलीस ठाण्यात मिळून आली. जळगांव तालुका पोलीस स्टेशन यांनी शोध घेतला. दुचाकी मालक सुनिल बुधा जाधव यांना जळगांव पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय गायकवाड यांच्या हस्ते व सहकारी पोहेकॉ प्रविणा जाधव, मदतनीस होमगार्ड अक्षय मोरे, बंटी राठोड, यांच्या उपस्थितीत हि दुचाकी जळगांव तालुका पोलीसांनी मालकांना परत दिली.