पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसमणी येथे घराचा दरवाजा तोडून ९७ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी शिवाजी पाटील ( रा. शिरसमणी ता. पारोळा) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत . २५ डिसेंबररोजी रात्री ११ ते २६ डिसेंबररोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घरातील सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत ९७ हजार रूपये चोरून नेले. पारोळा पोलीस ठाण्यात संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ विजय भोई करीत आहेत