वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणीतील गुणवत्ता चाचणीचे कनिष्ठ कर्मचारी प्रबंधकांना स्कुटरच्या होड लाईट मध्ये पाच ए .७ .६२ चे गोळ्या मोटर सायकलीत लपवून घेऊन जात असताना सुरक्षा विभागाने पकडल्याची घटना दि. २६ बुधवार रोजी निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उघडकीस आली. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुध निर्माणीतील गुणवत्ता अश्वासक विभागाचे कनिष्ठ अभियंता सतिष जयसिंग इंगळे हे दुपारच्या १२. ४५ वाजेच्या सुमारास जेवणाच्या सुट्टीत निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या मोटर सायकल क्र एम एच १९ ए टी १५०४ या दुचाकीने बाहेर जात असताना त्यावेळी कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक सि व्ही भारंबे यांनी त्यांच्या अंगाची झडती घेतली. दुचाकीची तपासणी केल्यानंतर दुचाकीच्या हेडलाईडच्या वरच्या भागात गाडी पुसण्याच्या कपड्यात ए के ४७ बंदुकीमध्ये वापरणारी ए ७. ६२ च्या पाच गोळ्या चोरीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे आढळून आल्या.
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला निर्माणी सुरक्षा अधिकारी संभाजी सुधाकर पाडवे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात असून सतिष जयसिंग इंगळे यांना अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास उप निरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.