यावल;- शहरातील नगरपालिका रोडवरच्या एका सराफ दुकानावर चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने यांसह रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली असून यामुळे तालुक्यात एकाच खळबळ उडालीय आहे.
जगदीश कवडीवाले ( रा- यावल ) यांचे मुख्य बाजारपेठेत बाजीराव काशिनाथ कवडीवाले या नावाचे सराफ दुकान आहे . आज नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता त्यांनी दुकान उघडून व्यवहार सुरू केले. दरम्यान दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका पल्सर गाडीवर ३ अज्ञात दरोडेखोरांनी येऊन दागिने बनवायचे सांगितल्याचा बहाणा केला.
त्याच्यापाठोपाठ चोथाही आला त्यानंतर चौघांपैकी एकाने दुकानदार जगदीश कवडी वाले यांच्या छातीवर बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या दुकानातील सोन्याचे दागिने आणि काही रोकड असा ऐवज लंपास केल्याची घटना घडली