जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,
पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षककिरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना धरणगाव पो.स्टे. भाग ५ गुरनं २४८/२०२१ भादवि कलम ३७९ व धरणगाव पो.स्टे. भाग ५ गुरनं ४९९/२०२० भादवि कलम ३७९ या गुन्ह्यातील चोरी झालेली मोटार सायकल ही चेतन योगेश पाटील , रा.शनी मंदिर चौक पारोळा जि.जळगाव याने चोरी केल्याची गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने किरणकुमार बकाले यांनी सफौ अशोक महाजन,
प्रदीप पाटील, जयंत चौधरी, दादाभाऊ पाटील, पोना नंदलाल पाटील, पोना प्रमोद लाडवंजारी, विनायक पाटील,भगवान पाटील, सचिन महाजन, मुरलीधर बारी, अशोक पाटील यांच्या पथकाने चेतन योगेश पाटील, रा.शनीमंदिर चौक पारोळा जि.जळगाव सागर रविंद्र पाटील, दोघ रा.शनीमंदिर चौक पारोळा या दोघांनी २ मोटार सायकल चोरी करून विक्रम अरुण गायकवाड रा.पारोळा यास सदरची मोटार सायकल विकत घेतल्याने त्याला देखील आरोपी करण्यात आले.