बोदव( प्रतिनिधी )- येथील विविध भागांमधून दुचाकी लांबविणाऱ्या अट्टल चोरट्याला बोदवड पोलिसांनी पाच दुचाकींसह अटक केली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,बोदवड शहरातील रहीवाशी शेख सिकंदर शेख मुक्तार रा. हिदायत नगर यांची दुचाकी (एमएच १९ एएफ ४७०७) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बोदवड शहरपोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीची चोरी करणारा संशयित आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यात असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यानुसार बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी संशयित आरोपी अविनाश विज्ञान बोदडे (वय-२७) रा. शेलवड ता. बोदवड जि.जळगाव ह.मु. लपाली ता. मोताळा जि.बुलढाणा याला अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ रविंद गुरचळ करीत आहे
.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळे, सहाय्यक फौजदार सुधाकर शेजोळे, पोहेकॉ रविंद्र गुरचळ, पोहेकॉ वसंत निकम, पो.ना. शशिकांत शिंदे, पो.कॉ. मुकेश पाटील, पो.कॉ. दिलीप पाटील, पो.कॉ. मनोहर बनसोडे, पो.कॉ.ईश्वर पाटील आदींनी केली.