निमखेडी शिवारातून दुचाकी लंपास
जळगाव (प्रतिनिधी)
निमखेडी शिवारातून एकाची दुचाकी लांबविल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरीष दत्तात्रय बोरणारे (वय-५०) रा. नितीन साहित्या अपार्टमेंट निमखेडी शिवार जळगाव हे कुटुंबियांसहराहतात . त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १० बीसी ७६४०) २३ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांनी दुचाकी त्यांच्या घराच्या पार्कींगमध्ये लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने १५ हजार रूपये किंमतीचा दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार २४ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. गिरीष बोरणारे यांनी दुचाकीचा शोधाशोध केली परंतू दुचाकी आढळून आली नाही. दोन महिन्यानंतर सोमवारी १७ जानेवारी रोजी दुपारी तालुका पोलीसात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत होते.