भुसावळ तालुक्यातील घटना उघड
भुसावळ (प्रतिनिधी) :- उभ्या कारचा दरवाजा उघडत असलेल्या तरुणास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्मेंद्र महिपत लोधी (राजपूत) (रा. बदोरा जि. झांशी उ.प्र.) असे मयत तरुणाचे नाव आहे. धर्मेंद्र लोधी हा तरुण २२ व २३ डिसेंबरच्या दरम्यान भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यावरील बी. जी. जिमच्या बाजुला जात होता. तेथे मनोज बुटासिंग चितोडिया यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारचा दरवाजा उघडत होता. त्यावेळी तो चोर असल्याचे समजून जमेरसिंग चितोडीया व पप्पूसिंग चितोडीया व इतर दोघा अनोळखी इसमांनी त्याला काठी व बॅटने मारहाण केली. मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
पोलीस अमोल रामचंद्र पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बबन जगताप करत आहेत.