जळगाव (प्रतिनिधी) – मेहरूण परिसरातील गजानन हॉस्पिटल जवळ असणाऱ्या रामनगरमधून गच्चीवर उशीखाली ठेवलेले ४ मोबाइलला अज्ञात चोरटयांनी लांबविल्याची घटना १५ रोजी घडली याप्रकरणी आज एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, रामनगर येथे राहणारे शैलेश हिरालाल लुंकड हे १५ रोजी जेवण करून घराच्या गच्चीवर आई ,वडील आणि आजोबांसह झोपायला गेले होते . मात्र रात्री १० ते पहाटे ४ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यानी कम्पाऊंडवर उडी मारून गच्चीवर उशीखाली ठेवलेले चार विविध कंपन्यांचे १८ हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली . मात्र मोबाईलचा तपास लागत नसल्याने आज १८ रोजी फिर्याद देण्यात आली असून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्य्क फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील करीत आहे.