जळगावात पिंप्राळा भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात हाणामारीच्या घटना वाढतच आहेत. काही एक कारण नसताना तरुणावर चॉपरने वार करत त्याला संशयित आरोपींनी जखमी केले. शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी ११ वाजता ही घटना आझादनगर परिसरात रजा चौकात घडली. या प्रकरणी रविवार दि. २५ रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पप्पु जहांगीर शेख (वय २५,रा. हुडको पिंप्राळा) हा तरुण रजा चौकात उभा होता. या ठिकाणी गोलु सैय्यद, सोहील शेख, अबुझर ( सर्व रा. हुडको) त्याच्याजवळ आले. काही एक कारण नसताना संशयितांनी शिवीगाळ केली. त्यानंतर चॉपरने वार करुन डोळ्याला दुखापत केली. या प्रकरणी तिघा संशयित तरुणाविरुध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ राजेश चव्हाण हे करीत आहेत.