चोपडा ( प्रतिनिधी ) – येथील राष्ट्रीय लोक अदालतीत आज दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे प्रलबित 420 पैकी 80 दावे आणि बँक, म.रा.वी. म.,विविध बँका व ग्रामपंचायतीच्या दाखलपूर्व 11276 दाव्यांपैकी 339 दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले यातून 1 कोटी 34 लाख 61हजार 049 रुपये वसुली झाली
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालकाविरुद्ध शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या धनादेश अनादराचे 59 वाद निकाली निघाले 59 लाख 91 हजार 343 वसूल झाले .
उच्च न्यायालय व विधीसेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये 11डिसेंबररोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती यात दिवाणी व फौजदारी प्रलबित 420 पैकी 80 तर दाखलपूर्व प्रकरणे ग्रामपंचायतीच्या दाखलपूर्व प्रकरणे, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, म.रा.वी.म,च्या दाखलपूर्व 11276 प्रकरणापैकी 339 प्रकरणे निकाली निघाले
राष्ट्रीय लोक अदालतच्या पॅंनलवर दिवाणी न्या डी. जी. म्हस्के यांच्यासमोर पंच म्हणून अँड बी. सी. पाटील, अँड सी.एच. पाटील, चोपडा वकील संघाचे अध्यक्ष अँड किरण जाधव , सचिव अँड विलास डी. बाविस्कर, उपाध्यक्ष मिलींद बाविस्कर, अँड प्रसाद काबरे, अँड एस. एफ. जैन, अँड प्रवीण एच. पाटील, अँड नितिन चौधरी, अँड उमेश बी. पाटील, अँड धर्मेंद्र एस. सोनार, अँड सी. आर. निकम, अँड ऐ. व्ही. जैन , अँड एस. डी. सोनवणे, अँड अबादास पाटील, अँड एस. डी.पाटील, अँड एस. जे .पाटील, अँड रिजवान पटेल, अँड पी. एच. माळी, अँड नितीन महाजन , अँड नितीन एम.पाटील, अँड यु. के. पाटील आदी हजर होते
चोपडा न्यायालयातील दिवाणी व फौजदारी प्रलंबित 420 वाद होते त्यातून दिवाणी 1 , फौजदारीचे धनादेश अनादर 74 व पती-पत्नी वादाचे पाच असे 80 वाद निकाली काढण्यात आले यात 76 लाख 73 हजार 10 रुपये वसूली झाली. दाखल पूर्व प्रकरणात 57 लाख 88 हजार 039 रुपये वसूल करण्यात आले दाखल प्रकरणातून 76 लाख 73 हजार 10 रुपये वसूल करण्यात आले असे 1 कोटी 34 लाख 61 हजार 49 रुपये वसूल करण्यात आले
चोपडा साखर कारखानातर्फे अँड .मिलिंद बाविस्कर यांचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बार असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यानी व न्यायालय सहा.अधिक्षक एस.जी.नगरकर , सहा.अधिक्षक डी. जी. चौधरी, लघुलेखक ए. ए. माळी, वरीष्ठ लिपिक ए. एच.परदेशी, दिनेश राजपूत, कनिष्ठ लिपिक राजेंद्र ठाकूर , डी.एम. महाजन, एन.डी. कुलकर्णी, एम. बी. बाविस्कर, एस. जे. देवरे, एस. के. पाटिल, वाय.महाजन, बेलीफ एस. के. शेकडे, बी. जी .सूर्यवंशी, शिपाई प्रशांत पाटील, प्रवीण पाटील, दिपक महाजन आदिंनी सहकार्य केले. पंचायत समितीचे जे.पी.पाटील यांचे सहकार्य लाभले.