चोपडा शहरात पोलिसांची धडक कारवाई
चोपडा( प्रतिनिधी) :- शहरातील केजीएन कॉलनीत एका व्यक्तीच्या घरी चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. यात १ लाख ८७ हजार ३८० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील इसमास ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीसांनी अधिक तपास करीत धाड टाकली. गुरुवारी दि. २४ रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास मोहम्मद कादिर शेख आयुब (वय ३८, रा. केजीएन कॉलनी, चोपडा) याच्या नायरा पेट्रोल पंपच्या मागील गल्लीमध्ये राहत असलेल्या घरात घराच्या बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये प्रतिबंध असलेल्या पान मसाला व सुंगधीत तंबाखू / जर्दा दिसून आला. हा माल १ लाख ८७ हजार ३८० रुपयांचा आहे. हा माल पहाटेलाच विक्री करतांना आढळून आला. चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरील इसमास ताब्यात घेण्यात आले आहे.
अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव कविता नेरकर (पवार) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि एकनाथ भिसे, पो.उ.नि. अनिल भुसारे, पो.उ.नि. जितेंद्र वालटे, पो.उ.नि श्री. विजय देवरे, पो.उ.नि श्री. योगेश्वर हिरे, स.पो.उ.नि जितेंद्र सोनवणे, पोहेकों संतोष पारधी, पोहेको शिपी, पोहेकों ज्ञानेश्वर जवागे, पोना संदिप भोई, पोको प्रकाश मथुरे, पोकों प्रमोद पवार, पोको विनोद पाटील, पोकों अमोल पवार, पोकों मदन पावरा, पोकों रजनिकांत भास्कर, पोकों अक्षय सुर्यवंशी, पोकों समा तडवी अशांनी सदरची कारवाई केली आहे.